ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी thane Standing Committee election; ravindra fatak win

ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी

ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी
www.24taas.com, ठाणे
ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत आघाडी गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी बाजी मारलीय.

लोकशाही आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, आणि अपक्षांचा समावेश असलेल्या गटातर्फे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रविंद्र फाटक यांना तर महायुतीच्यावतीनं बसपाच्या विलास कांबळेंना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली. ठाणे मनपाच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यातील आठ मतं रवींद्र फाटक यांना तर इतर आठ मतं विलास कांबळे यांना मिळाली.

दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून सभापतींची निवड होणार होती. यामध्ये चिठ्ठीनं रवींद्र फाटक यांना कौल दिला आणि आघाडीच्या गोटात एकच जल्लोष झाला. ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या आता काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत.

First Published: Tuesday, October 16, 2012, 12:33


comments powered by Disqus