‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात, thane varsha marathon start

‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात

‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात
www.24taas.com, ठाणे

महाराष्ट्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या धावपटूंचा सहभाग असलेल्या २३व्या ठाणे महापौर ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरूवात केली. जवळपास तीस हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. यात प्रामुख्यानं पुण्यातील ए.एस.आयचे एलबिनिंग, इलाम सिंग, आशिष सिंग, करण सिंग, बी.सी.तिलक, ज्ञानसिंग या प्रसिद्ध धावपटूंचा समावेश आहे. स्पर्धेसाठी २० डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलंय. स्पर्धेकरता धावपटूंसाठी बदलापूर ते ठाणे आणि ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

First Published: Sunday, August 26, 2012, 09:19


comments powered by Disqus