ट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे

ट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे

ट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे
www.24taas.com, नवी मुंबई

ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल मार्गावर लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खुशखबर. ठाणे-पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल्स आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळं या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे.

या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे रात्री उशीरापर्यंत आता या मार्गावर लोकल्स धावणार आहेत. वाशीहून ठाण्याकडे येण्यासाठी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी तर ठाण्याहून वाशीला जाण्यासाठी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी शेवटची लोकल होती. या वेळा आता वाढवण्यात येणार आहेत.

मार्चपासून या मार्गावर उशीरा लोकल धावतील असं रेल्वेच्या सुत्रांनी सांगितलयं. याचा फायदा ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यात काम करणा-या कामगार वर्गाला होणार आहे. नवं वेळापत्रक सेकंड शिफ्टमध्ये काम करणा-या कामगारांना उपयुक्त ठरणार आहे.

येत्या मार्चपासून ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल्सचं नवं वेळापत्रक असणार आहे.

First Published: Tuesday, January 15, 2013, 12:50


comments powered by Disqus