त्यांना पाणी पडले महागात...शो रुममधून १.२२ लाख लंपास, theft in Ulhasnagar

त्यांना पाणी पडले महागात...शो रुममधून १.२२ लाख लंपास

त्यांना पाणी पडले महागात...शो रुममधून १.२२ लाख लंपास
www.24taas.com, झी मीडिया, उल्हासनगर

उल्हासनगरमधल्या गुरुदेव कुकरेजा यांना पाणी पिणं चांगलंच महाग पडलंय. कुकरेजा यांची एक लाख बावीस हजार आणि महत्वाचे कागदपत्रं असलेली बॅग एका शो रुममधून घेऊन चोरानं धूम ठोकली.

सोमवारी सकाळी उल्हासनगरच्या व्ही.जे. होंडा शो रुममध्ये ते गाडीचं सर्विस बुक घेण्यासाठी गेले.. तिथं पाणी पिण्यासाठी जाण्याकरता हातातली पिशवी खुर्चीवर ठेवली. त्याचवेळी एका चोरानं ती पिशवी घेऊन तिथून पोबारा केला.

पाणी पिऊन झाल्यावर खुर्चीवर पिशवी नसल्याचं कुकरेजा यांच्या लक्षात आलं. या पिशवीत कुकरेजा यांनी बँकेतून काढलेले एक लाख बावीस हजार, जागेची महत्वाची काही कागदपत्रं होती. हा सगळा प्रकार शोरुममधल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय.. या फुटेजच्या मदतीने पोलीस चोराचा शोध घेतायत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, January 21, 2014, 07:52


comments powered by Disqus