मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली... , Three killed in accident Chiplun

मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...

मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथे लक्झरी बस उलटून दहा वर्षीय मंथनसह तिघेजण ठार झालेत. तर २२ जण जखमी झाले. मुंबईत एक अन्य प्रवाशी बसला होता. मात्र, बोलक्या मंथनने त्यांना विनंती करून विंडो सीट मिळवली होती. या विंडो सीटने मंथनचा घात केला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावर्डेनजीक आगवे (ता. चिपळूण) येथे शनिवारी पहाटे लक्झरी बस उलटून अपघात झाला. या अपघातातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

लक्झरी बस जोगेश्वररी येथून राजापूरला निघाली होती. सावर्डेनजीक आगवे येथे ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव कारला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालक खिचडू लक्ष्मीराम प्रजापती (५५, पवई-मुंबई) याने बस रस्त्याकडेला घेतली. मात्र, अवघड वळणावर बस महामार्गवरच पलटी झाली आणि ४० फूट खाली कोसळली. यामध्ये मंथन रेडीज आणि केशव मठकर हे खिडकीतून बाहेर पडल्याने बसखाली चिरडले गेले.

मृतांमध्ये मंथन नंदकुमार रेडीज (१०, जांभारी, रत्नागिरी), केशव तुकाराम मठकर (५०, चुनाकोळवण, राजापूर), धाकलिंग रामलिंग जंगम मामा (३५, मुंबई) यांचा समावेश आहे. क्रेनच्या साहाय्याने बसखाली अडकलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013, 08:22


comments powered by Disqus