शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा, toll free maharashtra is impossible - ajit pawar

शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा

 शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा


www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
आजच्या घडीला राज्यात शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.. काही लहान रस्ते आणि पूलांवरील टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली..

काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला होता.

काही पक्ष लोकप्रियतेसाठी राजकारण करतात त्यामुळे जनतेची दिशाभूल होते असही अजित पवारांनी म्हटल होतो. शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण आंदोलन करतांना कोणालाही त्रास होणार नाही हे बघितले पाहिजे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 21:40


comments powered by Disqus