Last Updated: Sunday, August 25, 2013, 18:03
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्गदुर्मिळ वनस्पती आणि प्राणी संपदेचा समृद्ध वारसा लाभलेला भारतातला पश्चिम घाट पर्यावरण प्रेमींनी नेहमीच गजबजलेला असतो. या पश्चिम घाटाचा मोठा भाग महाराष्ट्रात येतो. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली घाट जैवविविधतेने परिपूर्ण असा आहे. इथल्या निसर्गसंपदेच्या अभ्यासासाठी पर्यावरणप्रेमी सतत इथे रीघ लावतात....
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी पासुन आवघ्या तीस किलोमिटरवर सह्याद्रीच्या घाट माध्यावर वसलेलं आंबोली. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुनही या आंबोलीची ओळख. समुद्र सपाटीपासुन 750 मिटरवर असणा-या याच आंबोलीत वर्षाला सरासरी 3500 मिलीमीटर पावसाची नोंद होते. आंबोलीत असणा-या जास्त पर्जन्यमानामुळं इथल्या जंगलात हजारो प्रकारचे वृक्ष विवीध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात. त्यामुळं पर्टकांबरोबर पर्यावरण अभ्यासक मोठ्या प्रमाणात आंबोलीत दाखल होतात. पण आंबोलीचा मानचिन्ह असणारा मलबार ग्लॉईडींग फ्रॉग बरोबरच अनेक जातीची बेडकं आणि सरपटणारे प्राणी रात्रीच पहायला मिळत असल्यानं पर्यावरण प्रेमीही रात्रीच जंगल सफारी करतात...
आंबोलीतील जैवविविधता अशी की पर्यावरणप्रेमी दरवर्षी न चुकता आवर्जून इथं हजेरी लावतात. नयनरम्य धबधब्यांमुळे जरी आंबोली हे टुरिस्ट डेस्टिनेशन असलं तरी इथल्या जैवविविधतेची ओळख सा-यांना होणंही तितकंच गरजेचं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 25, 2013, 18:03