गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी traditional beach party in Guhagar

गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी

गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी
www.24taas.com, गुहागर

सध्या सगळीकडेच धूम पहायला मिळत आहे ती थर्टी फस्टची... रत्नगिरीतल्या गुहागरमध्ये हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गुहागरच्या समुद्रकिनारी पारंपरिक कार्यक्रम आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे..खास पर्यटकांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकमंत्री भास्कर जाधवांनी बैलगाडी हाकली.

नववर्षात स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत...शांत आणि निसर्गरम्य वातावरणात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना दरवर्षीच आकर्षित करतात. गुहागरमध्ये खास थर्टी फस्टच्या निमित्ताने बीच पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. या पार्टीत कोकणी पद्धतीचे उकडीचे मोदक, भाजणीचे वडे, थालीपीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचे प्रकार खास पर्यटकांसाठी बनवण्यात येत आहेत. खवय्यांसाठी खास मेजवानी ठरलीय.
तर, अन्य पर्यटकांबरोबरच पालकमंत्री भास्कर जाधवही राजकारणाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत थर्टी फर्स्टच्या उत्साहात रंगले. जाधवांनी चक्क बैलगाडी हाकायचा आनंद घेतला.

थर्टी फर्स्ट म्हटलं की, पब-डिस्को हे ओघाने आलंच..मात्र, गुहागरच्या समुद्रकिना-याचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे पारंपरिक संस्कृती जपण्याचा खास प्रयत्न करण्यात आलाय. यात वासुदेव, वारकरी पंथाचं नृत्य पर्यटकांना वेगळा आनंद देतंय. पारंपरिक संस्कृतीचा आनंद घेणा-या कोकणातल्या पर्यटकांसाठी सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचं स्वागत नक्कीच इतरांपेक्षा वेगळं असणार.

First Published: Monday, December 31, 2012, 16:49


comments powered by Disqus