Last Updated: Monday, November 25, 2013, 09:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.
या मार्गावरील रुळांची लांबी अतिशय कमी असल्याने त्यांना जोडणारे अंतरही कमी आहे. त्याचा परिणाम लोकलच्या वेगावर होतो. लोकल वेगात असल्यास खडखडाट होऊन त्याच्या हादरे बसल्याने रुळांच्या देखभालीची समस्या वारंवार उद्भवते. हे टाळण्यासाठी जास्त लांबीचे रुळ या मार्गावर टाकले जात आहेत.
डाऊनच्या कोणत्या गाड्या झाल्या रद्द... ठाणे-वाशी ११.४२ , १२.०० , १२.१३ , ०१.०० , ०१.२७
ठाणे-पनवेल १२.०७ , १२.५० , १.१३
ठाणे-नेरुळ १२.२२
अपच्या कोणत्या गाड्या झाल्या रद्द... वाशी-ठाणे ११.२५ , ११.३९ , १२.०० , १२.२२ , १२.५० , ०१.२०
नेरुळ-ठाणे ११.३९ , १२.०८ , ०१.०२
पनवेल-ठाणे १२.१३
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 09:28