बदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला Train sleeps near badlapur

बदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला

बदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला
www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर

बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या लोकलचा महिलांचा डबा रूळावरून घसरला. दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ही घटना घडलीय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

आज कल्याण बदलापूर दरम्यान मेगाब्लॉक होता. त्यामुळे कर्जत आणि बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान विशेष लोकल चालवल्या जात होत्या. त्यातली एक लोकल दोन वाजताच्या सुमारास दोन नंबर फलाटावर जाण्यासाठी क्रोसिंग करत असताना मोटरमनचा पहिला डबा घसरला. हा डबा महिलांचा होता, डबा घसरल्याने डब्यातील महिलांनी उड्या मारल्या मात्र त्यात कोणालाही इजा झाली नाही.

या घटनेने कल्याण कर्जत अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झालीय. तसंच याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 21, 2013, 17:29


comments powered by Disqus