कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यूTrain Tragidy, 4 Gangman under Koyna Express

कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यू

कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यू
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

आज रविवारच्या दिवशी ट्रॅक दुरुस्तीचं काम करणाऱ्या चार गँगमनना मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं. या अपघातात चारही गँगमनचा जागीच मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबईहून पुण्याकडं जात असलेल्या कोयना एक्स्प्रेसनं कल्याण स्टेशनजवळील कत्री पुलाजवळ ट्रॅक दुरुस्तीचं काम करत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना उडविलं. या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गँगमन रेल्वे ट्रॅकच्या पाहणीचे काम करत होते. हे काम सुरू असताना गाडी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि अपघात झाला असं सूत्रांनी सांगितलं. रेल्वेच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार एखाद्या ट्रॅकची पाहणी सुरू असताना त्याच ट्रॅकवर गाडी आली तर मुख्य कामगार शिटी वाजवून आणि झेंडा दाखवून सहकाऱ्यांना ट्रॅकपासून दूर जाण्यास सांगतो. त्यासाठी संबंधित अधिकारी अथवा वरिष्ठ कामगार अन्य कामगारांपासून काही अंतरावर उभा असतो. गँगमनचा अपघात झाला त्यावेळी असा अधिकारी किंवा वरिष्ठ कामगार ट्रॅकवर होता की नव्हता?, याचीही चौकशी करण्यास सांगितल्याचं समजतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 14:04


comments powered by Disqus