कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड, Tripple murder in Kalyan

कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड

कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड
www.24taas.com, झी मीडिय़ा, कल्याण

कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड घडलंय. शहरातील आग्रा रोडवरील मयुरेश इमारतीत आई, वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आलाय. गणपती चौकातल्या मयुरेश इमारतीत चौथ्या मजल्यावर ही घटना घडली आहे.

सुभाष वानखेडे आणि प्रमोदीनी वानखेडे हे दाम्पत्य आणि त्यांचा २९ वर्षांचा मुलगा ज्ञानेश्वर यांचा मृतदेह घरात आढळून आलाय. ज्ञानेश्वर यानं घटनेपूर्वी काही जणांना मोबाईलवरुन एसएमएसही केलाय. तसंच १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांनाही माहिती कळवल्यानं घटनेचं गूढ वाढलंय. ज्ञानेश्वर वानखेडे हा आयआयटीमध्ये टेक्निशिअन म्हणून कार्यरत होता.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. उघडं कपाट आणि घरात इतस्ततः विखुरलेल्या वस्तू यांवरून घरफोडीच्या उद्देशाने हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही नेमक्या कुठल्या कारणावरुन हे हत्याकांड घडलंय याचा पोलिस तपास करत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 14, 2013, 08:21


comments powered by Disqus