शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली दोनजणांचा मृत्यू two died under Public Latrine

शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली दोनजणांचा मृत्यू

शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली दोनजणांचा मृत्यू

www.24taas.com, भिवंडी

भिवंडीतील नागाव परिसरात सार्वजनिक शौचालय कोसळून त्यात ढिगा-याखाली दोन जणांचा मृत्यू झालाय. तर ४ जण जखमी झालेत. जखमींवर भिवंडीतील IGM या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भिवंडीत नागाव परिसरातील १० आसनी सार्वजनिक शौचालय सकाळी अचानकपणे कोसळले. त्यावेळी शौचात बसलेले ६ जण ढिगा-याखाली अडकले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. मात्र त्याआधीच महावीर केशरवानी आणि मझरुल आलम दोघांचा मृत्यू झाला.

शंकर पाटील, शाहरुख मोहम्मद खान, मोहम्मद अन्सारी, मादिक अन्सारी हे जखमी झालेत. या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचं महापालिका उपायुक्त विजयकुमार मसाले यांनी सांगितलंय.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नागाव परिसरात शोककळा पसरली आहे.

First Published: Sunday, September 9, 2012, 23:42


comments powered by Disqus