मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार, Vasind railway station on fire

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनवर गोळीबार
www.24taas.com, झी मीडिया, शहापूर

मध्य रेल्वेच्या वाशिंद स्टेशनमध्ये आज सकाळी गोळीबार झाला. महिला डब्यात लपून बसलेल्या दोघांनी हा गोळाबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

वाशिंदमध्ये ट्रेन पकडताना हॉटेल व्यावसायिक प्रवीण शेलार यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. सकाळी ५ वाजून २६ मिनिटांच्या कसारा-सीएसटी लोकलमध्ये प्रवीण शेलार बसले होते. त्या लोकलमध्ये बसलेल्या एकानं त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार करणा-या दोघांपैकी एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर एक जण फरार झाला आहे.

हा हल्ला पूर्ववैमनास्यातून झाल्याचे म्हटले जात आहे. प्रवीण शेलार यांच्यावर गोळीबार करण्याआधी लोकलमध्ये दोघे लपून बसले होते. कोणाचा संशय बळावू नये म्हणून या दोघांनी महिला डब्याचा आसरा घेतला. प्रवीण शेलार लोकलमध्ये चढण्यास आले असता दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 25, 2013, 11:06


comments powered by Disqus