Last Updated: Monday, October 22, 2012, 21:59
www.24taas.com, विरारमहिला पोलीस अधिका-याला पोलीस ठाण्यातच मारहाण झाल्याची घटना विरारमध्ये घडलीये. सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव प्रियतमा मुंडे असं आहे. मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीये.
एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं. या मुद्यावरुन पोलीस आणि मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. यावेळी मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली. मुंडे यांच्यावर सध्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान हे प्रकरण पोलिसांकडूनच दडपण्याचा प्रकार सुरु आहे. प्रियतमा मुंडे यांना कॅमेरासमोर आणण्यास पोलिसांनी नकार दिला.
First Published: Monday, October 22, 2012, 21:59