बंदबाबत मनसेची नेमकी भूमिका काय?, What about MNS role in thane protest

बंदबाबत मनसेची नेमकी भूमिका काय?

बंदबाबत मनसेची नेमकी भूमिका काय?
www.24taas.com, ठाणे

ठाण्यामध्ये सुरू असलेल्या बंदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. त्याच वेळी मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांचं नाव मात्र बंदला पाठिंबा देणाऱ्या पोस्टरवर झळकलं आहे. त्यामुळे मनसेची बंदबाबत नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे बंदला विरोध असल्याचे त्यांनी कालच्या पत्रकार परिषेदत स्पष्ट केले होते. त्याचसोबत मनसेचा कोणताही पदाधिकारी जर बंदमध्ये सहभागी झाल्यास त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल असेही राज ठाकरे यांनी बजावले होते.

मात्र मनसे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांचं नाव बंदच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बॅनरवर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बॅनरवर मनसे शहर अध्यक्षाचे नाव झळकल्याने मनसेची बंदबाबत नेमकी भूमिका काय? असा सवाल सामान्य ठाणेकरांना पडला आहे.

First Published: Thursday, April 18, 2013, 14:07


comments powered by Disqus