सिंधुदुर्गमध्ये नेमके काय चाललंय ? आजही जाळण्यात आल्या बाईकWhat Is Happening In Sindhudurg?Today Bi

सिंधुदुर्गमध्ये चाललंय काय? आजही जाळल्या बाईक

सिंधुदुर्गमध्ये चाललंय काय? आजही जाळल्या बाईक
www.24taas.com , झी मीडिया, सिंधुदुर्ग

कुडाळ पाठोपाठ बाईक जाळण्याचे लोण आता मालवणातही पसरले आहे. आज कुडाळ येथे पहाटेच्या सुमारास तीन बाईक जाळण्यात आल्या आहेत. मालवणमधील दांडी भागात ही घटना घडली आहे.

दांडी भागात मच्छिमार वस्ती आहे. दाट वस्ती असल्याने या भागातले तरुण एकत्रित गाड्या पार्क करतात. रात्री गाड्या पार्क करून गेल्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे.

या आधी गुरुवारी कुडाळमध्ये १८ बाईक जाळण्याचा प्रकार घडला होता. होंडा शो रूममध्ये उभ्या असलेल्या बाईक्स जाळण्यात आल्या. दसऱ्याला या बाईक्स विक्रीसाठी आल्या होत्या.

त्यानंतर आज पुन्हा एकदा मालवणमध्ये बाईक जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये नेमके काय चाललंय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
दरम्यान या घटनेमागे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेला पर्ससीननेटचा वाद असावा अशी चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 12, 2013, 14:50


comments powered by Disqus