Last Updated: Wednesday, April 17, 2013, 14:01
www.24taas.com, ठाणेसोन्याच्या दरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. सोनं खरेदीचा हा `गोल्डन चान्स` साधण्यासाठी सध्या ग्राहकांची लगबग सुरुयं. काही ठिकाणी तर अक्षरश: रांगा लागल्या आहेत. सराफांच्या दुकानात होणा-या ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चार लाखांचे दागिने लंपास केलेत.
मात्र दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात हे चोरटे कैद झालेत. ठाण्यातल्या राजवंत ज्वेलर्समधली ही घटना आहे. मंगळवारी दुपारी एक ३५ ते ४० वर्षीय महिला आपल्या दोन साथीदारासह सोने खरीदी करण्यासाठी ज्वेलर्स च्या दुकानात आली होती. दुकानात त्यावेळी असलेल्या गर्दीचा फायदा उठवून तिनं चार लाखांचा हार कपड्यात टाकून दुकानातून पलायन केले.
चोरट्यांची सर्व हकीकत ज्वेलर्स दुकानात लागलेल्या सीसी टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानामध्ये लागलेल्या सीसी टीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. तसंच या चोरट्यांना आपण आपल्या परिसरात पाहिले तर 02225331416 या नंबर संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी केल आहे.
First Published: Wednesday, April 17, 2013, 14:01