पक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुलीCongress accepts defeat, says will introspect-Sonia

पक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली

पक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.

त्याचबरोबर निवडणुकीत महागाईचा मुद्दा प्रामुख्यानं पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज सोनियांनी व्यक्त केला. पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात अजून वेळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, "आम आदमी पक्षा`चं अभिनंदन करताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाचं सखोल विश्लेआषण करणार असल्याचं सांगतानाच पक्षसंघटनेत बदलाचं सूतोवाच केलं. या निमित्तानं काँग्रेस संघटनेत डागडुजी आणि बदलाचे वारे वाहणार असल्याचं स्पष्ट आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 08:10


comments powered by Disqus