विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च, Bharatiya Janata Party`s Black March In Nagpur

विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च

विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
www.24taas.com,नागपूर

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.

कापसाला सहा हजार रुपये, तर सोयाबीनला पाच हजार प्रती क्विंटल भाव तसेच केंद्राने आणलेला एफडीआय त्वरित रद्द करा या मागण्यांसह धानाला योग्य भाव देण्याच्या मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी भाजपने पुढाकार घेताला आहे. त्यासाठी मोर्चाचे आयोजन भाजपने केलेय.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार युवक, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा मोर्चा आहे. गोंदियावरून सायकल रॅली सुरू झाली ती आज मंगळवारी विधानसभेला धडक देणार आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी वर्धा ते नागपूर अशी पदयात्रा काढली आहे.


आघाडी सरकार राज्यात जे नव्याने औष्णिक विद्युत प्रकल्प आणणार आहे. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची ९० हजार एकर शेतजमीन जाईल आणि प्रकल्पांच्या लगतची शेतजमीन नापीक होईल, असं भाजपचे म्हणणे आहे. याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा असणार आहे.

First Published: Tuesday, December 11, 2012, 12:08


comments powered by Disqus