Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:07
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरराज्यातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी उद्योगांना पुरवण्यात येणाऱ्या वीज दरात सवलत देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिली.
उद्योजकांना दिलासा देताना घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज दरातही सवलत दिली जाणार असल्याचे राणे म्हणाले. राज्यातील उद्योगांचे स्थलांतर होऊ नये म्हणून राज्य सरकार हा निर्णय घेणार आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजेचे दर अधिक आहेत. हे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल दोन दिवसात सरकारला सादर होऊन वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 23:07