विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव Honour to Zee 24 taas in Vidhan Sabha

विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव

विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव
www.24taas.com, मुंबई

आज विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव झाला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि झी 24 तासच्या टीमचा विधान परिषदेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त भागात जाऊन झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी माहिती घेऊन तिथली वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली. काही जण पत्रकारितेत चांगलं कामही करत आहेत, असं दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. `झी 24 तास`नं दुष्काळग्रस्तांचे जे अश्रू जनतेसमोर मांडले त्याचा हा गौरव आहे. केवळ व्यथाच मांडून आम्ही थांबलो नाही, तर जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकरांच्या मुलाखतीतून आम्ही दुष्काळावर उपायही सुचवले. याचं राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनीही यापूर्वीच कौतुक केलं होतं. आता विधिमंडळात `झी 24 तास`च्या अभिनंदनाचा हक्क लोकप्रतिनिधींनी बजावला आहे. आमच्या कामाला विधिमंडळात पावती मिळाली आहे.


रोखठोक भूमिका घेऊनही समस्या सोडवता येतात हे `झी 24 तास`नं वेळोवेळी दाखवून दिलय. राज्याच्या समस्या असोत, वा जिल्ह्याच्या किंवा तुमच्या गावाच्या, `झी 24 तास`नं वेळोवेळी या समस्या सोडवण्यासाठी बातमीपत्रातून आणि उपक्रमांद्वारे पुढाकार घेतलाय. यानिमित्तानं विधायक पत्रकारितेच्या दिशेनं `झी 24 तास`नं एक पाऊल पुढे टाकलय.

First Published: Thursday, March 21, 2013, 21:41


comments powered by Disqus