Last Updated: Sunday, March 17, 2013, 16:26
www.24taas.com, मुंबईगरीबांना अनास्था दाखवल्य़ाप्रकरणी राज्यातल्या 53 पैकी 31 रुग्णालयांना राज्य सरकारनं नोटीसा बजावल्यात... गरीब रूग्णासाठी राखीव खाटा ठेवण्यात ही रुग्णालंय अपयशी ठरलीयत. यांत मुंबईतल्या 4 बड्या रुग्णालयांचा समावेश आहे.
राज्याच्या आरोग्य विभागान चेरीटेबल पंचताराकित रूग्णालयाना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात. राज्यातील ५३ रूग्णालयांपैकी ३१ रूग्णालयांनी गरीबांबद्दल अनास्था दाखवलीय.. या रूग्णालयांनी १० टक्के दुर्बल घटक आणि १० टक्के दारिद्रय रेषेखालील गरीब रूग्णासाठी राखीव खाटा ठेवल्य़ा नाहीत.
या चॅरिटेबल पंचताराकित रूग्णालयात मुंबईतील हिंदुजा जसलोक, लिलावती, बॉम्बे हॉस्पिटलचा समावेश आहे. या रूग्णालयावर कारवाई व्हावी यासाठी अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी लक्षवेधी लावलीय.
या चेरीटेबल पंचताराकित रूग्णालयानी वार्षिक एकूण उत्पानाच्या २ टक्के निधी गरीब रूग्णासाठी खर्च करायचा असतो.मात्र ही रूग्णालय दुर्बल घटक आणि दारिद्रय रेषेखालील गरीब रूग्णासाठी राखीव खाटा ठेवत नाहीत. मात्र राज्य सरकारकडून चेरीटेबल ट्रस्टच्या नावान भूंखड,जादा एफएसआय,नवीन आरोग्याची साधनसामुग्री खरेदीवर जकात माफीचे फायदे उकळतात.
राज्याच्या आरोग्य विभागान नोटीस बजावल्या असल्या तरी गरीब रूग्णांना न्याय देण्यासाठी कायदाच नसल्यानं चेरीटेबल पंचताराकित रूग्णालयांवर कोणती कारवाई होणार हाच खरा सवाल आहे.
First Published: Sunday, March 17, 2013, 16:23