Last Updated: Tuesday, March 19, 2013, 08:49
www.24taas.com, मुंबई राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.
वाळू माफियांविरोधात कारवाई करणाऱ्या तहसिलदार, अधिकारी किंवा पोलीस यांच्यावरील हल्ल्यांचं प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत चाललंय. अनेकदा कारवाई होऊनसुद्धा वाळू माफिया कोणाला दाद लागू न देता बेसुमार वाळू उपसा करत असतात... तेव्हा वाळू माफियांना मोका लावणार का? असा प्रश्न विरोधकांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला. यावर गृह विभागाशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलंय.
सावंतवाडी तालुक्यात गौण खनिज उत्खनानबद्दल प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न विचारण्यात आला. वाळू माफियांवार मोका लावता येईल का? अशी विचारणा उपसभापती वसंत डावखरे यांनी सरकारला केली आणि हाच मुद्दा लावून धरत विरोधकांनी मोका लावण्याची मागणी लावून धरली.
First Published: Tuesday, March 19, 2013, 08:49