बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन, nagpur winter session day 5th

बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...

बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...
www.24taas.com, नागपूर

नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवसही कामकाजाविना संपला.

सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. सिंचनाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानपरिषदेचं कामकाजही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलयं.
आज सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या आवारात जोरदार निदर्शनं केली. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली. भाजप चर्चेला घाबरतंय, असा आरोप करत विधीमंडळाचं कामकाज सुरळीत सुरू रहावं, अशी मागणीही राष्ट्रवादीनं केलीय. दुसरीकडे राष्ट्रवादीविरोधात भाजपनंही निदर्शनं सुरू केली आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं चित्र सध्या विधानभवन परिसरात पहायला मिळालं.

First Published: Friday, December 14, 2012, 17:18


comments powered by Disqus