Last Updated: Sunday, December 9, 2012, 20:56
www.24taas.com, मुंबईकोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री राहतील आणि उपमुख्यमंत्री या नात्यानं कामकाजात सहभागी होतील, असंही चव्हाण यांनी सांगितलं. अजितदादांच्या सकारात्मक विचारांनी राज्याचा विकास साधला जाईल, असंही ते म्हणाले.
खासगी विद्यापीठाचं विधेयक या अधिवेशनात पुन्हा मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
First Published: Sunday, December 9, 2012, 20:56