‘आबांची भाषा अंडरवर्ल्डची’, R.. R.. Patil`s statement Underworld - Mungantiwar

‘आबांची भाषा अंडरवर्ल्डची’

‘आबांची भाषा अंडरवर्ल्डची’
www.24taas.com,नागपूर

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भाषेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय. ही भाषा अंडरवर्ल्डची असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलंय.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अविश्वास ठरावाबाबत आजच चर्चा घ्यावी, असा आग्रह धरताना विरोधकांना सभागृहात व रस्त्यावर त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, बघून घेऊ, दोन हात करण्याची आमची तयारी आहे, असे आव्हान दिले. यावर गृहमंत्री माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा आवाज विरोधकांनी दिला. यानंतर तीन वेळा कामकाज तहकूब झाले. शेवटी दिवसभरासाठी कामकाज संपल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, कोणतीही चुकीची भाषा वापरली नसल्यानं माफी मागणार नसल्याचं आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्याच आता जोरदार खडाजंगी उडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नागपूरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनातला गोंधळ कायम आहे. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. आर. आर. पाटील यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याचा निषेध करत विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला.

First Published: Wednesday, December 12, 2012, 16:39


comments powered by Disqus