24taas.com-Chemical in soap, toothpaste impairs muscle strength

टूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपोशी कमजोर

टूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपोशी कमजोर

www.24taas.com, न्यूयॉर्क

साबण, डिओडरंट, टूथपेस्ट आणि इतर अनेक शरीर प्रसाधन उत्पादनांमध्ये ट्रिक्लोसन नामक एक अँटीबॅक्टेरिअल केमिकल वापरलं जातं. मात्र हे केमिकल शरीरातील मांस-पेशींमधील शक्ती कमी करतं, असं नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलं आहे.

ट्रिक्लोसन बहुतेक सगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रसाधन उत्पादनांच्या रुपात आढळतंच. हे केमिकल पर्यावरणालाही हानीकारक ठरतं. आम्ही केलेल्या प्रयोगांमधून आणि त्यांच्या निष्कर्षावरून सिद्ध होतं की ट्रिक्लोसन मानवी आरोग्याला आणि पर्यावरणालाही घातक आहे. असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया- डेव्हिस स्कूल ऑफ व्हेटेरिनरी औषध आणि प्रिंसिपल स्टडी इन्वेस्टिगेटर आयझॅक पेसाह यांचं म्हणणं आहे.

ट्रिक्लोसन हे अँटी-बॅक्टेरिअल बहुतेक सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये आढळतं. हँड सोप, डिओडरंट, माऊथवॉश, टूथपेस्ट, चटई, खेळणी, ट्रॅश बॅग यांसारख्या वस्तूंमध्ये ट्रिक्लोसन असतं. मांसपेशांच्या हलचाली, पेशी आणि हृदयाच्या ठोक्यांवर या ट्रिक्लोसनचा नकारात्मक परिणाम होतो.

First Published: Tuesday, August 14, 2012, 13:28


comments powered by Disqus