Last Updated: Saturday, October 20, 2012, 11:19
www.24taas.com, लंडनशास्त्रज्ञांनी आपल्या नव्या अभ्यासात असा दावा केला आहे की रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तींना कँसर होण्याचा धोका अधिक असतो. रात्रपाळी आणि प्रोस्टेट, कोलोन, फुप्फुसं, मूत्राशय, गुद्द्वार, पॅनिर्कियास कँसर आणि लिंफोमा यांच्यामधील संबांची माहिती देणारा हा पहिलाच रिपोर्ट आहे.
या रिपोर्टच्या प्रमुख शोधकर्त्या प्रोफेसर मेरी एलिस पेरेंट्स म्हणाल्या की रात्रीच्या वेळी प्रकाशात काम करण्यामुळे झोपेची हार्मोन्स मेलाटोनिनचं उत्पादन कमी होऊ लागतं. यामुळे मानसिक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे ट्युमर होण्याची शक्यता असते.
पेरेंट्स म्हणाल्या, की रात्रीच्या अंधारात काही हार्मोन्सचा स्त्राव होत असतो. हे स्त्राव माणसाची रोगप्रतिकारक्षमता वाढवत असतात. मात्र रात्री जागं राहून काम करत राहिल्यास हे हार्मोन्स स्त्रवत नाहीत. असा निष्कर्ष अमेरिकन जर्नल ऑफ एपिड्मिऑलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलंय.
First Published: Saturday, October 20, 2012, 11:19