चॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव Chocolate is similar to opium

चॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव

चॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच  प्रभाव

www.24taas.com, लंडन

जर तुम्ही चॉकलेटचे वेडे असाल, तर जरा संभाळून राहा.. कारण चॉकलेटही अमली पदार्थाइतकंच घातक ठरू शकतं, आणि तुम्हाला चॉकलेटचं व्यसन लागू शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून सांगण्यात आलंय, की चॉकलेट मेंदूवर अफूएवढाच प्रभाव पाडतं.

अतिस्थुल व्यक्ती आणि व्यसनी व्यक्तींमध्ये या अभ्यासात समानता आढळून आली. चॉकलेट खाणाऱ्यांच्या मेंदूमध्ये ‘एन्केफलिन’ हा स्त्राव आढळून आला, याचे गुणधर्म अफूमधील एन्ड्रोफिनशी मिळते-जुळते आहेत.

`डेली मेल` या वृत्तपत्रात दिलेल्या बातमीनुसार याचा प्रयोग प्रथम उंदरांवर केला गेला. त्यात लक्षात आलं की चॉकलेट खाण्यामुळे मेंदूमधील एन्केफॅलिनची मात्रा वाढली. मुख्य संशोधक डॉ. ऍलेक्झांड्रा डिफेलिसेंटोनियो म्हणाल्या, आम्ही मेंदूत सक्रिय होणाऱ्या डॉर्सल नियोस्ट्रियेटमचा अभ्यास केला. त्यात आम्हाला जाणवलं की अतिजाड लोक आहार पाहिल्यावर आणि अमली पदार्थ सेवन करणारे मादक द्रव्य घेतल्यावर डॉर्सल नियोस्ट्रियेटम सक्रिय होतं.

First Published: Saturday, September 22, 2012, 15:06


comments powered by Disqus