डी व्हिटॅमिन ठरवते तुमची खाद्य एलर्जी, D vitamin deiced your food Allergic

डी व्हिटॅमिन ठरवते तुमची खाद्य एलर्जी

डी व्हिटॅमिन ठरवते तुमची खाद्य एलर्जी
www.24taas.com, बर्लिन

गर्भवती महिलांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ‘डी’ची याच्या प्रमाणावर जन्मानंतर मुलांमध्ये खाद्य एलर्जीची समस्या उद्भवू शकते. हेल्महोल्ट्जचा क्रिस्टीन वेबेज याच्या टीम कडून केलेल्या अभ्यासात एलआईएनए नमुनाचा वापर केला गेला. हे नमुने हेल्महोल्ट्ज सेंटर फॉर एन्वाइरमेंटल रिसर्च (जर्मनी) मधून घेण्यात आले. या अभ्यासात ६२२ माता आणि त्याचे ६२९ मुलांवर दिर्घ काळ संशोधन करण्यात आले.

अभ्यासात गर्भवती आईचे रक्त आणि जन्माला येणारे मुलाच्या गर्भनाळेमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन डी चे परिक्षण केले. या नंतर पहिल्या दोन वर्षात मुलांमध्ये होणाऱ्या खाद्य एलर्जीचे प्रमाण नोंदवण्यासाठी एका प्रश्नावलीचा वापर केला गेला. निकालात असे निदर्शनास आले कि ज्या गर्भवती महिलामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी होते, त्या मुलांमध्ये दोन वर्षाच्या दरम्यान खाद्य एलर्जीचे प्रमाण कमी होते.

याचा अर्थ व्हिटॅमिन डी चे उच्च प्रमाण असलेल्या गर्भवती महिलाचा मुलांमध्ये खाद्य एलर्जीचे जास्त धोका आहे. असं मानले जाते कि, व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत बनवते तसेच हिवाळात ऋतू संक्रमणापासून संरक्षण होते. हे तंत्रिक आणि स्नायूतंत्रासाठी सुध्दा उपयुक्त आहे.

First Published: Wednesday, March 13, 2013, 07:35


comments powered by Disqus