Last Updated: Sunday, June 16, 2013, 18:52
www.24taas.com, झी मीडिया, रोमसाधारणतः पुरूष आणि स्त्री यांच्या हृदयामध्ये फरक असल्याचं म्हटलं जातं. पण ते आता सिद्ध होत आहे. जेव्हा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीपासून डाव्या हातापर्यंत वेदना सरकत जातात. तर महिलांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीपासून पोटाकडे वेदना सरकतात.
पडुआ विश्वविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये या विषयावर संशोधन चालू आहे. येथील प्रोफेसर जियोविनेला यांनी यासंदर्भात टिप्पणी दिली. स्त्री आणि पुरुषांच्या हृदयामध्ये खूप फरक आहे. कँसर, ओस्टियोपोरोसिस तसंच फारमेकोलॉजी यांमध्ये स्त्री-पुरूष यांच्या हृदयातील फरक लक्षात येतो.
महिलांमधील आजार लवकर लक्षात न येण्याचं कारण हृदयतील फरक हाच आहे. त्यामुळे ईसीजी, एनडाईम डॉइनेस्टिक टेस्ट तसंच अँजियोग्राफी यातून हा फरक लक्षात येत नसल्यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत.
First Published: Sunday, June 16, 2013, 18:52