काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या Eating lunch at desk and not taking breaks doubles blood clot risk

काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या

काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या
www.24taas.com, लंडन

दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अविश्रांत काम करत राहातो. जेवणासाठीही ब्रेक न घेता काम करता करता एकीकडे खात राहातो. यामुळे डीप व्हेन थ्रंबोसिस(DVT) या आजाराची शक्यता दुपटीने वाढते. डीव्हीटीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत जातात.

डीव्हीटी चॅरिटी लाइफब्लडट्आ अन्या स्टीफन्स-बोल या संदर्भात बोलताना म्हणाल्या, “बऱ्याच वेळा असं होतं, की आपण तासन् तास काम करत राहातो. आणि काम करता करताच एखादा सँडविच बसल्या जागी संपवतो.”

नव्या आकडेवारीतून हे स्पष्ट होऊ लागलंय की डीव्हीटीमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातील बहुसंख्य लोक ४०च्या आतील वयोगटतले आहेत. २००७ साली डीव्हीटीने मरण पावणाऱ्यांची संख्या ६७ होती ती २०१० साली ९४ झाली. यामध्ये ४०% वाढ होत आहे. या आजारामुळे धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात आणि फुप्फुसांपर्यंत रक्तपुरवठा होण्यास अडचमी येतात. यातल्या कित्येक केसेस या उपचारांच्या पलिकडे जात असल्याची भीतीही अन्या स्टीफन्स-बोल यांनी व्यक्त केली.

तज्ज्ञांच्या मते डीव्हीटीपासून बचाव करण्यासाठी सतत हलचाल करायला हवी. सतत एकाच जागी बसून न राहाता थोड्यावेळ फइरणं, अतिरिक्त वजन कमी करणं तसंच धूम्रपान कमी करणं आवश्यक आहे. याशिवाय आहारातील मीठाचं प्रमाण कमी केल्यास डीव्हीटीचा धोका टळू शकतो.

First Published: Wednesday, October 10, 2012, 13:12


comments powered by Disqus