महिलांनो सुडौल बांध्यासाठी करा हे उपाय, Health news related women figure

महिलांनो सुडौल बांध्यासाठी करा हे उपाय

महिलांनो सुडौल बांध्यासाठी करा हे उपाय
www.24taas.com, मुंबई

महिला आपल्या फिगर बाबत नेहमीच चिंतेत असलेल्या दिसून येतात. मात्र त्याचबरोबर, आपली फिगर जास्तीत जास्त आकर्षक कशी असेल यासाठी अनेक उपाय करतात. मात्र त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतोच असे नाही. जर आपण प्राचीन भारतीय संस्कृतीतील शिल्पकला वा चित्रकला यांची उदाहरणे विचारात घेतली की लक्षात येते, की यातील स्त्रीया कमनीय व सुडौल बांधा असलेल्या दाखविल्या गेल्या आहेत.

प्राचीन वाड्ःमयातूनही अशाच प्रकारच्या सौंदर्याची चर्चा/वर्णने केलेली आढळतात. यासाठी अभ्यंग व मर्दन (मालीश) करून केलेले स्नान, योग, ध्यान-धारणा या सर्वांचा वापर करून शरीराचे सौंदर्य विकसित करण्याचे प्रयत्नय केले गेलेले आढळतात. बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे इ. शब्दात आपण त्यांचे वर्णन करू शकतो अथवा केलेले आढळते. स्त्रीचा देह हा कमनीय, पुष्ट, पण चपळ असणे म्हणजेच तिच्या सौंदर्याचे लक्षण मानले जात असे.

आधुनिक काळातील स्त्रियांनीदेखील या गोष्टींकडे आजही दुर्लक्ष करून चालणार नाही. तिनेदेखील आपल्या व्यग्र व व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या शरीरयष्टीबाबत व सुडौल बांध्याबाबत विचार केला पाहिजे. व्यायाम, आरोग्य व स्त्रीचे देहसौंदर्य या सर्वांचा सुरेख संबंध साधण्याचे प्रयत्नब करावेत.

First Published: Thursday, March 21, 2013, 19:35


comments powered by Disqus