दूध प्या लहानपणी, फायदा त्याचा म्हातारपणी Milk for health

दूध प्या लहानपणी, फायदा त्याचा म्हातारपणी

दूध प्या लहानपणी, फायदा त्याचा म्हातारपणी
www.24taas.com, वॉशिंग्टन

शक्ती आणि बुद्धीसाठी दूध प्यावं असं लहानपणापासून आपण ऐकत असतो. अनेकवेळा आपल्याला दूध पिणं आवडत नसूनही लहानपणी जबरदस्तीने दूध प्यावं लागलं असेल. पण आता नव्या संशोधनातून आपल्या या भारतीय पारंपरिक मान्यतेला दुजोरा मिळाला आहे.

ब्रिस्टॉल विश्वविद्यालयातील काही संशोधकांनी शोध लावला, की बालपणी दूध किंवा इतर डेअरी उत्पादनं ज्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर गेली असतात, त्यांना वृद्धपकाळातही वेगाने चालणं जमू शकतं. तसंच त्यांचं संतुलन बिघडत नाही.

बालपणी दूध प्यायल्यास वृद्धपकाळात शऱीर थकत नाही असं संशोधनात स्पष्ट झालंय. संशोधनाच्या सुरुवातीलाच ही महत्वाची गोष्ट समोर आली आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती महत्वपूर्ण ठरत आहे, कारण वृद्धपणी फ्रॅक्चर झाल्यास त्यावर उपाय करणं अधिक सोपं होईल.

First Published: Thursday, November 8, 2012, 17:21


comments powered by Disqus