जांभळ्या कपड्यामुळे आकर्षित होतात महिला... , Purple cloth attract to lady

जांभळ्या कपड्यामुळे आकर्षित होतात महिला...

जांभळ्या कपड्यामुळे आकर्षित होतात महिला...
www.24taas.com

प्रेमात असफल असणाऱ्या पुरूषांनी आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत. असा दावा एका संशोधनानंतर करण्यात आला आहे. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. जांभळ्या रंगाचे कपडे घालणारे पुरूष महिलांना जास्त आवडतात.

त्यांच्यासोबत डेटवर जाणं पसंत करतात. त्यांच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात. संशोधनकर्त्यांच्या मते, महिला ह्या पुरूषांच्या कपड्यांच्या आवडीनिवडीवर जास्तीत जास्त लक्ष ठेवत असतात. त्यामुळे त्यांना पुरूषांनी जांभळ्या रंगाचे कपडे घातलेले जास्त आवडतात.

जर एखाद्या वेळेस डेटवर जाताना तुम्ही अगदीच गबाळ्यासारखे गेल्यास तुमच्या पार्टनरचा मूड खराब होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त आकर्षित कसं करता येईल याकडे लक्ष देणं कधीही गरजेचं आहे.

First Published: Tuesday, October 16, 2012, 14:38


comments powered by Disqus