Last Updated: Thursday, October 17, 2013, 11:42
www.24taas.com, वृत्तसंस्था, तिरुवनंतपुरम पश्चिमी देशांच्या धर्तीवर आता भारतातही स्कीन बँक सुरु झालीय. केरळमध्ये ही स्कीन बँक सुरू करण्यात आलीय.
एका प्लास्टिक सर्जननं दिलेल्या माहितीनुसार स्कीन बँकेमुळं आता त्वचेचं प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
इंग्लंडमध्ये काम केलेले प्लास्टिक सर्जन एम. एस. जयशेखर सध्या राज्यात स्कीन बँक स्थापनेबाबत जागरुकता अभियान चालवतायेत. जयशेखर माहिती देतांना म्हणाले, “मी इंग्लंडमध्ये त्वचा प्रत्यारोपण करण्याचे अनेक ऑपरेशन केले आहेत. गंभीररित्या जळालेल्या कोणत्याही रुग्णाला सुरूवातीचे दिवस कठीण जातात. त्वचा प्रत्यारोपण केल्यास त्यांना खूप दिलासा मिळतो.”
त्वचेचं दान करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात निवृत्त सरकारी अधिकारी डी. बाबू. पॉल यांनी आपली त्वचा दान करण्याचं घोषित केलं. जयशेखर म्हणाले की, शरीरातील इतर अवयवांसारखंच त्वचेचंही दान करता येऊ शकतं, हे लोकांना सांगणं आज महत्त्वाचं झालंय.
First Published: Thursday, October 17, 2013, 11:41