तोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवतTeeth became Weak due to mouth acidity

तोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत

तोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत

शर्करायुक्त पदार्थ, गॅसयुक्त पेय आणि अन्य आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळं तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण यामुळं दात मुळापासून कमकुवत होतात.

टूथपेस्ट आणि इतर आरोग्याशी निगडीत उत्पादनं बनवणाऱ्या एका कंपनीनं नुकताच एक अहवाल प्रकाशित केलाय. या अहवालानुसार अॅसिडिटी फक्त पोटातचं होत नाही. तर त्याची सुरुवात तोंडापासून होते आणि या कारणानं दात कमकुवत बनत जातात. अगदी निरोगी आहार सुद्धा तोंडातील अॅसिडिटीचं कारण बनू शकतं. यामुळं तोंडात हानिकारक जिवाणू वाढण्याची शक्यता असते.

अॅसिडिटीची तीव्रता अधिक झाल्यानं, ते दातांचावरचा स्थर नष्ट करु शकतात. जिथं शर्करायुक्त खाद्यपदार्थ, गॅसयुक्त पेय आणि काही विशेष फळ अॅसिडिटी वाढवण्यचं कार्य करतात, तिथंच केळं, बटाटा, दुध यापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि पाण्याचं अधिक सेवन केल्यास अॅसिडिटी कमी होण्यास मदत मिळते.

अहवालानुसार भोजन केल्यानंतर, पुढील दोन तासांसाठी तोंडातील पीएच पातळीमध्ये कमतरता येते आणि लाळ तयार करणाऱ्या अॅसिडचा परिणाम कमी आणि ‘पीएच’चा स्तर वाढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर तुम्ही शर्करायुक्त खाद्यपदार्थ आणि गॅसयुक्त पेय यांचं सातत्यानं सेवन करत असाल तर अशा स्थितीत लाळ आपलं कार्य योग्यप्रकारे करत नाही. पीएच शरीरामध्ये संतुलनाचं मुलभूत घटक दाखवतो. तेव्हा काळजी घ्या आपल्या दातांची...



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013, 21:07


comments powered by Disqus