Last Updated: Saturday, May 19, 2012, 12:21
www.24taas.com, लंडन जास्त कॉफी पिणं प्रकृतीसाठी हानिकारक मानलं जातं. पण, नियमित कॉफी प्यायल्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होतं, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून काढण्यात आला आहे.
या संशोधनात चार लाखापेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीचं आणि त्यांच्या कॉफी सेवनाचं १४ वर्षं निरीक्षण करण्यात आलं. या संशोधनातून समोर आलंय की कॉफी न पिणाऱ्या वयस्कर लोकांपेक्षा कॉफी पिणाऱ्या वयस्कर व्यक्तींचं जीवनमान वाढलं.
‘डेली मेल’ च्या रिपोर्टनुसार रोज चार ते पाच कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा हृदयविकार, श्वसनविकार, मधुमेह, इन्फेक्शन यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून बचाव होतो.
First Published: Saturday, May 19, 2012, 12:21