जेवल्यावर ब्रश केल्यास दात होतील 'कायमचे साफ'! - Marathi News 24taas.com

जेवल्यावर ब्रश केल्यास दात होतील 'कायमचे साफ'!

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
काही खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर लगेच दात घासण्याची तुम्हाला सवय असेल, तर त्यामुळे दात पूर्णपणे खराब होऊ शकतात असा दंतवैद्यांचा दावा आहे.  खरंतर, दिवसातून दोनवेळा दात घासावेत, असा सल्ला दातांचे डॉक्टर्स देतात. मात्र, काही जणांना जेवल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यावर दात घासायची सवय असते. मात्र, ही सवय दातांसाठी अपायकारक आहे.
 
अमेरिकेतील अकॅडमी ऑफ जनरल डेंटिस्टचे अध्यक्ष डॉक्टर हॉवर्ड गँहल यांचं म्हणणं आहे, “आमच्या अभ्यासातून असं निष्पन्न झालंय की काहीही खाल्ल्यानंतर, विशेषतः आंबट पदार्थ खाल्ल्ल्यावर ब्रश केल्यास दात ठिसूळ होतात.”
 
डॉक्टर गँबल यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स'ला सांगितलं की आंबट पेय प्यायल्यानंतर त्यांतील अम्ल दातांमधील एनॅमलची सर्वांत खाली असणाऱ्या डेंटिनच्या थराला जाळण्यास सुरूवात करतात. अशा परिस्थीतीत ब्रश केल्यास दात जळण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होते. यामुलेच दात कायमचे पडू शकतात.

First Published: Wednesday, June 6, 2012, 09:15


comments powered by Disqus