जोडणार 'खांद्या'चा 'सांधा', नाही 'वांधा'! - Marathi News 24taas.com

जोडणार 'खांद्या'चा 'सांधा', नाही 'वांधा'!

www.24taas.com, पुणे
 
दिवसेंदिवस प्रगत होणा-या वैद्यकीय क्षेत्रात आता अजून एका महत्त्वपूर्ण आणि अद्भुत उपचारपद्धतीची भर पडली आहे. ती म्हणजे खांदा रिजनरेट करणं. खांद्याचं दुखणं असणाऱ्या आणि विशेषतः खेळाडूंसाठी ते वरदान ठरणार आहे.
 
शोल्डर रिजनरेशन अर्थात खांद्याचं पुनर्रोपण ही अनोखी शस्त्रक्रिया नुकतीच राष्ट्रीय बॅडमिंटनपटू कुणाल भिडे याच्यावर पुण्यात करण्यात आली. दीड वर्षांपूर्वी गाडीवरुन पडून जखमी झालेल्या कुणालला खांद्याची रिप्लेसमेट करावी लागली. पण त्यामुळे कुणालचं कार्टिलेज खराब होऊन त्याला वेदना होऊ लागल्या. त्यानंतर डॉक्टर बाभूळकरांनी कुणालला खांदा रिजनरेट उपचार पद्धतीचा सल्ला दिला.
 
डॉक्टर बाभूळकर हे भारतातच नव्हे तर दक्षिण आशियात खांद्याच्या सांध्यावर ही उपचार पद्धती करणारे पहिलेच डॉक्टर आहेत. या शस्त्रक्रियेत रुग्णाकडून निरोगी कार्टिलेज घेऊन त्याची योग्य वाढ करुन नंतर त्रुटी असलेल्या जागी ते रिप्लेस करण्यात येतं. त्यामुळे दोष नैसर्गिकरित्या आणि कायमचा दुरुस्त होण्याची खात्री मिळते. काळानुरुप बदलत जाणा-या वैद्यकीय क्षेत्रातली ही कार्टिलेज संबंधित उपचारपद्धती खेळाडूंसाठी रामबाण इलाज ठरणार आहे.
 

First Published: Tuesday, June 19, 2012, 21:19


comments powered by Disqus