ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका! - Marathi News 24taas.com

ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका!

www.24taas.com, कोपनहेगन
 
ट्रॅफिकचा गोंगाट जीवघेणा ठरू शकतो, असं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे. ट्रॅफिकमधील गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पब्लिक लायब्ररी ऑफ सायंस वननुसार डॅनिश कँसर सोसायटीच्या मेटी सोनेंसेन यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 
ट्रॅफिकमधील गोंगाट आणि हृदयाचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. संशोधनानुसार ट्रॅफिकमधील १० डेसिबलचा गोंगाट हृदय विकाराचा झटका वाढवण्याचा धोका १२% नी वाढवतो. त्यामुळे ट्रॅफिककडील गोंगाट हा जीवघेणा ठरू शकतो, या विधानाला पुष्टी मिळते.
 
डॅनिश कँसर सोसायटीने केलेल्या वक्तव्यानुसार ट्रॅफिकमधील आवाज आणि हृदयविकाराचा काय संबंध आहे, हे अजूनही लक्षात आलेलं नाही. मात्र, गोंगाटाबरोबरच अतिश्रम, वेळी-अवेळी जेवणं आणि अपुरी झोप यांसारख्या ताणतणावपूर्ण गोष्टींमुळे अचानक हा झटका येऊ शकतो.

First Published: Saturday, June 30, 2012, 18:06


comments powered by Disqus