Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:03
www.24taas.com, लंडन वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं अशक्य होत असेल, तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी अशी लस शोधून काढली आहे, जी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवते. यासाठी खाण्यावर कुठलंही नियंत्रण ठेवण्याची गरज नाही.
शोधून काढलेल्या या लसीचा पहिला प्रयोग प्रयोगशाळेतील उंदरांवर करून पाहिला गेला. लस टोचल्यानंतर ४ दिवसांनी त्या उंदरांचं वजन सुमारे १०% कमी झालं होतं. या चार दिवसांत उंदरांना वजन वाढवणारं अन्न देण्यात आलं होतं.
एका रिपोर्टनुसार संशोधक डॉ. केथ हाफर यांनी म्हटलं आहे की, संशोधनातून हे स्पष्ट झालंय की लसीकरणाद्वारेही जाडेपणावर नियंत्रण मिळवता येते. या लसीसाठी शरीरातील प्रतिकार क्षमतेचाही वापर केला गेला आहे. या प्रयोगावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळे जाडेपणाशी संबंधित अनेक पैलू समोर येतील.
First Published: Tuesday, July 10, 2012, 11:03