महिला फारच 'हुशार', पुरूषांना केले 'गार' - Marathi News 24taas.com

महिला फारच 'हुशार', पुरूषांना केले 'गार'

www.24taas.com, लंडन
 
महिला ह्या फारच हुशार असतात.. असं अनेक पुरूष नेहमीचं उपहासाने म्हणतात. किंबहुना महिलांना काहीही बुद्धी नसते अशीच ओरड अनेक पुरूष करतात.. पण अशी परिस्थिती अजिबात नाही. पुरूषांपेक्षा महिला ह्या अधिक बुद्धिमान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरुष आणि महिला यांच्यात अधिक बुद्धिमान कोण? यावर सतत वादविवाद झाले आहेत.
 
मात्र आता एका सशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिला अधिक बुद्धिमान असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. या संशोधनानुसार एकविसाव्या शतकात प्रथमच बुद्धीबद्दल महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. मानसशास्त्रज्ञांच्या एका पथकाने संशोधन करून महिलांना पुरुषांपेक्षा तर्कज्ञान अधिक असते असा निष्कर्ष जाहीर केला आहे. गेल्या १०० वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. एक शतकापूर्वी झालेल्या संशोधन चाचणीत महिलांना ५ गुण मिळाले होते. मात्र गेल्या काही वर्षांत पुरुष आणि महिलांमधील अंतर कमी होत होते.
 
या वर्षी झालेल्या चाचणीत बुद्धिमत्तेबाबत महिलांनी पुरुषांना पिछाडीला टाकले आहे.  हे संशोधन प्रख्यात तज्ज्ञ जेम्स क्लीन यांनी केली आहे. क्लिन यांच्या म्हणण्यानुसार गेल्या १०० वर्षांत महिला आणि पुरुषांमधील आयक्यू वाढत आहे. मात्र महिलांचा आयक्यू वेगाने वाढत आहे. महिला आधुनिक झाल्यामुळे त्यांचा आयक्यू वाढत आहे. ऑस्ट्रेलियात महिला व पुरुषांचा आयक्यू समान आहे तर न्यूझीलंड, एस्टोनिया आणि अर्जेंटिना या देशातील महिलांचा आयक्यू पुरुषांपेक्षा अधिक आहे.
 
 
 
 
 

First Published: Tuesday, July 17, 2012, 14:38


comments powered by Disqus