Last Updated: Tuesday, July 31, 2012, 10:43
www.24taas.com, लंडन नोकरीच्या ठिकाणी ताण तणावपूर्ण वातावरण असेल, तर काम करणाऱ्या लोकांना कमी वयातच वृद्धत्व येतं असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. शारीरिक कमजोरीचंही तणाव हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘फिनिश इंस्टीट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ’च्या किर्सी आहोला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संशोधनानुसार सतत ताण-तणावाखाली काम करणारी व्यक्ती टेन्शनमुळे आजारी पडू लागते. मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार त्यांना जडतात. कँसर होण्याची शक्यताही वाढते.
संशोधनानुसार सततच्या ताण-तणावामुळे क्रोमोसोमच्या शेवटी असणारा टेलोमीयर आक्रसू लागतो. एसं होणं म्हणजे म्हातारपण जवळ येत चालल्याची लक्षण असतात. किर्सी आणि त्यांच्या पथकाने ल्यूकोसाइस नामक रक्त कोशिकेचं विश्लेषण केलं. या रक्त कोशिका प्रतिकारक शक्तींच्या संचलनाच्या कामात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या संशोधनातूनच ताण-तणाव आणि वार्धक्य यांचा संबंध जाणून घेता आला.
First Published: Tuesday, July 31, 2012, 10:43