'बेबी ब्रेन सिंड्रोम' देतो चांगलं मातृत्व - Marathi News 24taas.com

'बेबी ब्रेन सिंड्रोम' देतो चांगलं मातृत्व

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन
 
गर्भवती महिलांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या गोष्टी लक्षात राहात नाहीत किंवा लक्षात ठेवलेल्या गोष्टी लगेच विसरायला होतात. पण, नुकत्याच एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की हा 'बेबी ब्रेन सिंड्रोम' आहे आणि हा स्त्रियांना एक चांगली आई बनण्यास मदत करतो.  
 
‘करंट डायरेक्शन्स इन सायकोलॉजिकल सायंस’ जर्नलमध्ये देण्यत आलेल्या विश्लेषणानुसार मोबईल एकीकडे ठेऊन विसरून जाणं, कारची चावी विसरून जाणं असा विसराळूपणा म्हणजे महिलांचं आपल्या गर्भातील बाळामध्ये गुंतलेल्या मनाचं द्योतक असतं. यामुळे बायका आपल्या गर्भातल्या बालकाची जास्त काळजी घेतात.
 
अमेरिकेतल्या चॅपमॅन युनिव्हर्सिटीच्या मानसोपचारतज्ज्ञ लॉरा ग्लीन यांचं म्हणणं आहे की गर्भधारणेच्या काळात स्त्रियांच्या ‘सेक्स हार्मोन’चा वाढलेला स्तर मातेच्या अशा वागण्याचं कारण ठरतो.  त्या असंही म्हणाल्या की स्त्रियांच्या मेंदूत होणारे बदल हे इतके दिवस सायंससाठी एक कोडं होतं. लाइव्हसायंसने ग्लीन यांच्या अभ्यासावरून असं लिहीलं आहे की मातांच्या तंत्रिकातंत्राच्या विकासासाठी गर्भधारणा हा अतिशय महत्त्वपूर्ण कालावधी असतो. आम्हाला अद्याप याबद्दल काही समजलेलं नाही.
 
 

First Published: Sunday, January 1, 2012, 10:30


comments powered by Disqus