गाढ झोप हवी असेल तर... - Marathi News 24taas.com

गाढ झोप हवी असेल तर...

www.24taas.com, मुंबई
 
सगळ्यांनाच शांत आणि गाढ झोप हवी असते. संशोधकांनी या गोष्टीचा अभ्यास केल्यावर खालील गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या.
 
गाढ झोप हवी असल्यास रात्री १० वाजता झोपावे. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी एक कप चहा प्यावा आणि पायजमा घालून झोपावे. यामुळे झोप चांगली लागते. 'डेली एक्सप्रेस'च्या एका रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं आहे की मनुष्याने, विशेषकरून स्त्रियांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर कमीत कमी २ तास ७ मिनिटे आराम करावा.
 
ब्रिटनमधील जवळपास २००० प्रौढांच्या केलेल्या सर्वेक्षणातून असं सांगण्यात आलंय की दिवसातील शेवटचं भोजन रात्र ८ वाजून २९ मिनिटांनी करावं आणि शेवटचं पेय चहा हे रात्र ९ वाजून १० मिनिटांनी पिण्यात यावं.
 
खरंतर आयुर्वेदातही असंच लिहीलं आहे की खाण्यात आणि झोपेमध्ये साधारण तीन ते चार तासांचं अंतर असलं पाहिजे. सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते, त्यामुळे रात्रचं जेवण हे कमी जेवावं. यामुळे पचनसंस्थेवर जास्त जोर पडत नाही. खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेत योग्य अंतर राखलं, तर बद्धकोष्ठतेसारख्या विकारांपासून मुक्ती मिळते. शहरातील लोक जेवल्यावर लगेच झोपतात. त्यामुळे त्यांना खाल्लेलं अन्न पचतत नाही. आणि सकाळी बद्दकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.
 

First Published: Tuesday, March 6, 2012, 15:14


comments powered by Disqus