प्रसूतीनंतरची ती......!!! - Marathi News 24taas.com

प्रसूतीनंतरची ती......!!!

झी २४ तास वेब टीम

 
प्रसूतीनंतर स्त्रियांची मानसिक स्थिती फारच बदलेली असते.  सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे यासारख्या गोष्टी जाणवतात. प्रसूतीनंतरच्या ३ दिवसांमध्ये उदास किंवा असहाय्य वाटणे हे सामान्य आहे.
 
स्त्रियांनी या भावनांविषयी जास्त चिंता करू नये कारण त्या साधारणपणे २ आठवड्यांमध्ये नाहीश्या होतात. प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य हा अधिक गंभीर स्वरूपाचा मूडमधील बदल असतो. तो अनेक आठवडे किंवा महिने कायम रहातो आणि दैनंदिन कामकाजांमध्ये ढवळाढवळ करतो. १० ते १५% स्त्रिया याने ग्रासलेल्या असतात. अगदी क्वचित याचेच अधिक गंभीर स्वरूप आकार घेते.
 
ज्या स्त्रियांमध्ये मानसिक तणाव निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये प्रसूतीनंतर मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्त्रिया खूपच उदास होतात, रडतात, चिडचिड्या आणि मूडी होतात आणि दैनंदिन कामकाज तसेच बाळामधील त्यांचे स्वारस्य नष्ट होऊ शकते. समुपदेशन आणि तणावविरोधी औषधे यांचा एकत्रितपणे वापर केल्यास फायदा होऊ शकतो.

First Published: Thursday, November 17, 2011, 15:18


comments powered by Disqus