Last Updated: Thursday, April 5, 2012, 15:34
www.24taas.com, न्यू जर्सी व्यायाम करून झाल्यावर एक कप कॉफी पिण्याची सवय शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. नुकत्याच एका संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे, की कॅफेन आणि व्यायम यांच्या एकत्रिकरणातून त्वचेच्या कँसरपासून बचाव होतो.
न्यू जर्सीमधील रुटगर्स अर्नेस्ट मारिओ स्कूल ऑफ फार्मसीच्या संशोधकांनी यासंदर्भात उंदरावर प्रयोग करुन पाहिले. यातून स्कीन ट्यूमरची शक्यता ६२ टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ज्या जनावरांवर उपचार करून झाले, त्यांच्यामध्ये ट्यूमरची शक्यता ८५ टक्क्यांनी कमी झाल्याचं आढलून आलं.
या संशोधनातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. याओ- पिंग लू यांनी सांगितलं, “व्यायाम आणि कॅफेन यांच्या संयोग उंदराना सूर्य किरणांमुळे होणाऱ्या कँसरचा धोका टळला. आम्हाला खात्री आहे, की भविष्यात या प्रयोगामुळे कँसरवरील उपचार होण्यास मदत मिळेल.”
First Published: Thursday, April 5, 2012, 15:34