Last Updated: Tuesday, April 10, 2012, 21:05
www.24taas.com, मुंबईगर्भात वाढणाऱ्या शिशूचे आरोग्य चांगलं राहावं याकरता गर्भवती महिलांसाठी आयुर्वेदात काही प्रभावी मार्ग सुचवले आहेत. या आयुर्वेदाने सुचवलेले हे काही सोपे उपाय अंमलात आणले, तर गर्भातल्या शिशूचा पूर्ण विकास होतो.
यासाठी गर्भधारणेच्या तिसरा महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत अशा सहा महिन्यांच्या काळात दररोज नियमीतपणे ‘सोम घृत’ घ्यावे. हे सोम घृत ‘सोम कल्याण घृत’ नावाने आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांत आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते.
दुसरा महिना सुरू होताच दुधात १० ग्रॅ. शतावरीचे बारीक वाटलेले चूर्ण आणि दळलेली खडीसाखर घालून ते मंद आचेवर उकळा. दूध कोमट झाल्यावर १ चमचा शतावरीचे चूर्ण खाता खाता दूध प्या. आणि दात घासून झोपा.
तिसऱ्या महिन्यात दूध थंड करुन त्यात १ चमचा साजूक तूप आणि ३ चमचे मध मिसळून ते सकाळ-संध्याकाळ पित राहा. याच महिन्यापासून सोम घृताचे सेवनही सुरू करा. हे सोम घृत दोन मोठे चमचे दूध किंवा फळांच्या रसासोबत घ्या. हे सोम घृतसेवन आठव्या महिन्यापर्यंत चालू ठेवा आणि त्यात खंड पडू देवू नका.
First Published: Tuesday, April 10, 2012, 21:05